
मिठाई मोर डॉट कॉम या ऑनलाईन पोर्टलवर आता आग्रा येथील सुप्रसिद्ध पेठा आणि रतलाम येथील नमकीन उपलब्ध करून दिले गेले आहे. सोमवारपासून ही सेवा सुरू झाली असून खाद्यप्रेमी आता हे पदार्थ ऑनलाईन बुक करून घरपोच मिळवू शकणार आहेत.
मिठाई मोर कडून आग्रयाचा पेठा ऑनलाईनवर
मिठाई मोर डॉट कॉमचे सहसंस्थापक व सीईओ रॉबिन चोप्रा म्हणाले जगात भारत असा एकमेव देश आहे जेथे विविध संस्कृतींची रेलचेल आहे. त्यामुळे प्रत्येक संस्कृतीतील सणवार, पारंपारिक खाद्यपदार्थ यांचीही विपुलता आहे. प्रत्येक सणासाठी खास पकवान्ने बनविली जातात. ही भारतीय खाद्य संस्कृती सर्वांपर्यंत पोहोचावी आणि ग्राहकांना या पदार्थांचा आस्वाद घरबसल्या घेता यावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. देशभरातील मिठायांचे प्रकार, खारे पदार्थ, चॉकलेट्स घरापर्यंत पोहोचविण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून घरापर्यंत सामान पोहोचविणे हा मोठा व्यवसाय बनला आहे.
