बलात्काराच्या खोट्या आरोपांतून वाचविणारे वुई कन्सेंट अॅप

weconsent
जगभरात बलात्कारासारख्या घटनात वाढ होत असताना व त्या विरोधातील कायदे कडक केले जात असताना बलात्काराच्या खोट्या आरोपातून वाचवू शकेल असे एक अॅप तयार करण्यात आले असून त्यामुळे खोटे आरोप झालेल्यांना दिलासा मिळू शकणार आहे. अमेरिकन डेव्हलपरने तयार केलेले वुई कन्सेंट हे अॅप त्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार युजर यामुळे शरीरसंबंध राजीखुशीने झाल्याचे सिद्ध करू शकणार आहे. युजर त्यासाठी २० सेकंद अगोदर व्हिडीओ क्लिप बनवू शकणार आहे. त्यात कोणाबरोबर त्याचे संबंध येत आहे याची नोंद होईलच पण कॅमेर्‍यासमोर दोघांचेही चेहरे येतील व दोघेही स्पष्ट शब्दात येस असे म्हणताना ऐकूही येईल.

इंग्लंडमधील रेप क्रायसिस सहाय्यता ग्रूपच्य केटी रसेल यांच्या म्हणण्यानुसार मंजुरी जबदरस्तीनेही घेता येते त्यामुळे या अॅपचा दुरूपयोग होऊ शकेल. मात्र डेव्हलपरच्या म्हणण्यानुसार मंजुरी जबरदस्तीने घेतली जात आहे याची जाणीव अॅपला झाली तर ते रेकॉडिंग आपोआप बंद करेल आणि युजरला पुन्हा ट्राय करा असे सांगेल. यातील डेटा इनस्क्रीप्टेड स्वरूपात ७ वर्षे सुरक्षित राहू शकणार आहे आणि तो फक्त न्यायसंस्थांनाच उपलब्ध करून दिला जाणार आहे असेही समजते.

Leave a Comment