ह्युंदाईने लाँच केली दमदार ‘क्रेटा’

hyundai
मुंबई: एसयूव्ही ‘क्रेटा’ ही नवी कार ह्युंदाई कंपनीने ग्लोबली लाँच केली असून या कारचा लूकही फारच आकर्षक असल्यामुळे क्रेटा कार बाजारात इतर कारला टक्कर देण्यास सज्ज झाली आहे.

आतापर्यंत तब्बल १५००० ‘क्रेटा’ची प्री-बुकींग झाल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. या कारचे मॉडेल नव्या जनरेशनच्या ग्राहकांचा विचार करुन तयार करण्यात आले असून आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, क्रेटा कार ह्युंदाईचा भारतात नवा ट्रेंड सेट करेल अशी माहिती ह्युंदाईचे सीईओंनी दिली.

६ वेगवेगळ्या मॉडेलमध्ये ह्युंदाई क्रेटा ही उपलब्ध आहे. या कारच्या बेस मॉडेलची किंमत रु. ८,५९,५५८ तर टॉप मॉडेलची किंमत रु. १३,५७,७७० एवढी आहे.

ह्युंदाई क्रेटा कारचे फिचर्स: प्रोजेक्टर एलईडी हेडलाइट्स, फ्रंट आणि रिअर स्किड प्लेटस, ५ इंच टचस्क्रिन एव्हीएन सिस्टम, इलेक्ट्रिकल अॅडजस्टेबल डोअर मिरर, साईड कर्टन्स आणि एअर बॅग, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलीटी कंट्रोल,

Leave a Comment