सॅमसंगचे एस सिरीजचे दोन नवे टॅबलेट लॉन्च

samsung
नवी दिल्ली- गॅलक्सी टॅब `एस’ सीरीजचे दोन नवे टॅबलेट सॅमसंग कंपनीने लाँच केले असून हे दोन टॅब आठ इंच आणि ९.७ इंचाचे असून हे दोन्ही टॅबलेट ऑगस्ट महिन्यात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.

या टॅबलेटच्या किंमती कंपनीने अद्याप गुलदस्त्यात ठेवल्या असून या दोन्ही टॅबलेटची जाडी कमी असून हे टॅब वजनास हलके आहेत. ३२ जीबी आणि ६४ जीबी इंटरनल मेमरीची सुविधा या दोन्ही टॅबमध्ये देण्यात आली आहे.

या टॅबलेटचा डिस्प्ले आठ इंचाचा आहे, तर ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉईड ५.० लॉलीपॉप आणि स्क्रीन रेझोल्यूशन २०४८x१५३६ पिक्सेलचा आहे. प्रोसेसर १.९ गिगाहर्टझ ऑक्टा कोअरचा तर तीन जीबी रॅम आणि रिअर कॅमेरा आठ मेगापिक्सेलचा तर फ्रंट कॅमेरा २.१ मेगापिक्सेलचा आहे.

Leave a Comment