
बंगळुरू : आपली वेबसाईट बंद करण्याचा निर्णय ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीच्या फ्लिपकार्टने घेतला असून ही शॉपिंग वेबसाईट लवकरच केवळ मोबाईल अॅपच्या स्वरुपात ग्राहकांच्या सेवेत येणार आहे.
आता फक्त अॅपच्या स्वरुपात ‘फ्लिपकार्ट’ !
काही दिवसांपूर्वी मैत्रां.कॉम ने घेतलेल्या या निर्णयामुळे ई-कॉमर्स क्षेत्राला पहिल्यांदा धक्काच बसला होता. पण, मैत्रां.कॉम ने घेतलेल्या या निर्णयानंतर अवघ्या दोन महिन्यांच्या आतच फ्लिपकार्टनेही आपली वेबसाईट बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती फ्लिपकार्टचे मुख्य प्रोडक्ट अधिकारी असलेल्या पुनित सोनी यांनी दिली असून सप्टेंबर महिन्यापासून फ्लिपकार्ट केवळ मोबाईल अॅपवरच काम करणार आहे. स्मार्टफोन आणि मोबाईल इंटरनेटच्या बिझनेस वाढवण्यासाठीही फ्लिपकार्टचे हे पाऊल मोठा हातभार लावणार आहे.
