आयबॉलने आणला रोटेशन कॅमेरा असलेला स्मार्टफोन

iball
नवी दिल्ली- आणखी एक स्मार्टफोन भारतात आयबॉल कंपनीने लॉन्च केला असून ‘एंडी अवोंते ५’ असे या स्मार्टफोनचे नाव आहे. या स्मार्टफोनची किंमत पाच हजार ९९९ रुपये आहे.

या स्मार्टफोनचे खास वैशिष्टय म्हणजे या स्मार्टफोनला आठ मेगापिक्सलचा फिरता (रोटेशन) कॅमेरा असून हा कॅमेरा फ्रंट आणि रिअर कॅमेरा असा दोन्ही बाजूने वापरता येणार आहे. तसेच या फोनमध्ये एकुण २१ भाषांचा समावेश करण्यात आला आहे. ३२ जीबीपर्यंतची एक्सपांडेबल मेमरी, अँड्रॉईड ४.४ किटकॅट, थ्री जी हे फिचर्स या स्मार्टफोनमध्ये देण्यात आले आहेत. येत्या दोन आठवड्यात या स्मार्टफोनची देशभर विक्री सुरू करण्यात येणार आहे.

Leave a Comment