रोज खाई अंडे, त्याशी कोण भांडे

egg
देशातल्या मुलांना अंडी खायला मिळाली तर नवी पिढी सशक्त होईल आणि अंडी खूप विकली गेली तर शेतकरी कुक्कुटपालन व्यवसाय फायद्यात चालेल या हेतूने पूर्वी सरकार अड्यांच्या वापराचे महत्त्व सांगणारी मोहीम चालवत असे.आताही दूरचित्रवाणीवर अंडी खाण्याचा आग्रह धरणारी जाहीरात झळकत असते.पण समाजात असा एक मोठा वर्ग आहे की ज्याचा अंड्यांना आक्षेप आहे.अंडे खाणे म्हणजे मांसाहार असा त्यांचा समज आहे म्हणून काही लोक अंड्यांना विरोध करीत असतात.आता आता एका जैन साधूंनी आपल्या धर्म बांधवांना रुमाली रोटी आणि नान न खाण्याचा आदेश दिला आहे.त्यांत अंड्यांचा वापर होत असल्याने त्यांचे सेवन करू नये असे त्यांचे म्हणणे आहे.त्यांच्या या आदेशावर आता वाद निर्माण झाला आहे आणि काही लोकांनी त्यांचा आदेश अज्ञानावर आधारलेला असल्याचे म्हटले आहे.

मध्य प्रदेशात मध्यान्ह भोजनात मुलांना पौष्टिक अन्न म्हणून अंडी देण्याचा प्रस्ताव होता पण मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या प्रस्तावाला विरोध केला असून शालेय आहारात अंडी न देण्याचा आदेश सोडला आहे.देशातले काही लोक अंडयाला विरोध करणारे असू शकतात पण एखादे सरकारच अंडी विरोधी कसे असू शकते असा प्रश्न आता मध्य प्रदेशात विचारला जात आहे.जैन लोक अंडी खातच नाहीत पण अंड्यांचा वापर करून तयार केलेले केकही खात नाहीत.साधारणत:शाकाहारी लोक अंड्यांना मांसाहारी समजून त्याचा वापर टाळतात.पण या विचारात तर्कशुद्धता नाही कारण शास्त्र (धर्म शास्त्र नाही)असे सांगते की अंडी ही मांसाहारी नसतात.

आधुनिक काळात कोंबड्या पिंजऱ्यात पाळल्या जातात.त्या पिंजर्केवळ कोंबड्याच असतात.त्यात कोंबडे म्हणजे नर नसतात.त्यामुळे अशा पिंजर् कोंबड्या जी अंडी देतात ती अंडी विफल असतात.त्यात जीव नसतो. मग ज्यात जीव नाही ते अंडे मांसाहारी कसे ?हे अंडे शाकाहारी असते आणि शाकाहाराचाच विचार केला तर या अंड्यात आणि गायीच्या दुधात फारसा फरक नाही.ही शाकाहारी अंडी खाणे आणि हे गायीचे दूध पिणे यात काही फरक नाही.आता वेगान आहार नावाचा नवा प्रकार येत आहे.हा आहार प्रकार केवळ मांसाचाच विरोध करतो असे नाही तर दुधासारख्या प्राणीज पदार्थांचाही विरोध करतो.शास्त्र नवी माहिती पुढे आणते पण अंडी म्हणजे मांसाहार असा परंपरागत विचार कवटाळून बसलेले लोक आपला हा विचार काही सोडायला तयार होत नाहीत.

1 thought on “रोज खाई अंडे, त्याशी कोण भांडे”

Leave a Comment