राजीनामा देणार ‘ट्विटर’ चे सीईओ

ceo
सॅन फ्रान्सिस्को : येत्या एक जुलैला आपल्या पदाचा आघाडीची सोशल नेटवर्किंग साईट ‘ट्विटर’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी डिक कोस्टोलो राजीनामा देणार आहेत. प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या मानाने ट्विटरची मंदावलेली वाढ आणि जाहिरातदारांना आकर्षित करण्यास असमर्थ ठरल्यामुळे कोस्टोलो यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या काही वर्षांत ट्विटरच्या वापरकत्र्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे कंपनीच्या नफ्यात घट झाल्याने कंपनीला गुंतवणूकदारांच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे.

Leave a Comment