पंधरा वर्षीय मुलाने शोधला नवीन ग्रह !

tom
स्टॅफर्डशर : स्टॅफर्डशरमधील एका १५ वर्षीय मुलाने चक्क नवीन ग्रह शोधून काढला आहे. टॉम वॉग या मुलाने पृथ्वीपासून एक हजार प्रकाश वर्ष दूर असणारा ग्रह शोधल्याने जगभरातील खगोलशास्त्र प्रेमींमध्ये टॉम हा चर्चेचा विषय झाला आहे.

ब्रिटनमधील किल विद्यापिठाने दिलेल्या माहितीनुसार टॉमने दोन वर्षापूर्वी कॉलेजच्या माध्यमातून घेण्यात येणा-या अंतराळ निरिक्षणाच्या स्पर्धेत भाग घेतला होता. या दरम्यान आकाश निरिक्षण करताना एका ता-याचे तेज अधून-मधून कमी होत असतानाच त्याच्यासमोरून कोणतीतरी गोष्ट जात असल्याचे निरिक्षण नोंदवले. टॉमच्या या निरिक्षणांच्या आधारे संशोधन केल्यानंतर ता-या समोरून जाणारी ती वस्तू म्हणजे त्या ता-या भोवती फिरणारा ग्रह असल्याचे समोर आले. टॉम हा १७ वर्षाचा असून त्याची दोन वर्षापूर्वीची निरिक्षणांवर अभ्यास करून ती वस्तू ग्रहच असल्याचा निर्वाळा करण्यासाठी किल विद्यापिठाने त्यावर दोन वर्ष काम केले.

दोन वर्षांनतर मिळालेल्या या सुखद धक्क्याने टॉम अगदी सात वे आसमान वर आहे. ‘मी खूपच आनंदी असून माझ्या त्या नोंदीवर एवढा दिवस अभ्यास करून त्याला दूजोरा मिळाला याचं आश्चर्य वाटत आहे, असे टॉमने सांगितले. टॉमने शोधलेल्या ग्रहाला अद्याप कोणतेच नाव देण्यात आले नसले तरी लवकरच त्याचे ‘बारसे’ होणार आहे.

Leave a Comment