ब्लॅकबेरी ओस्लोच्या इमेज लीक

oslo
ब्लॅकबेरी ओस्लोच्या इमेज व फोटो लिक झाले असून हा स्मार्टफोन ३० जूनच्या सुमारास सादर केला जाईल असे संकेत दिले जात आहेत. हा फोनही पासपोर्ट ब्लॅकबेरीसारखाच असेल असा अंदाज प्रथम वर्तविला गेला होता मात्र लीक झालेल्या फोटोवरून तो ब्लॅकबेरी पासपोर्टपेक्षा थोडा वेगळा दिसत आहे.

लिक झालेल्या फिचर्सनुसार या फोनसाठी १३ एमपीचा रियर कॅमेरा, ३ जीबी रॅम, स्टील फ्रेम व सिल्व्हर प्लॅस्टीक बॉडी, मागच्या बाजूला ब्लॅकबेरी झेड थ्री व लीप प्रमाणेच रबर बॅक, चौकोनी डिस्प्ले, १०.३.२ ऑपरेटिंग सिस्टीम असेल.

Leave a Comment