स्वस्त झाला शाओमीचा स्मार्टफोन

mi4
मुंबई: भारतीय मोबाइल बाजारपेठेत तळ ठोकलेल्या चीनी शाओमीने आपल्या Mi4 या स्मार्टफोनच्या किंमतीत घसघशीत घट केल्यामुळे आता हा स्मार्टफोन १९,९९९ रुपयात उपलब्ध असणार आहे.

शाओमीच्या अधिकृत ट्विटर अकांऊटवरुन काही वेळापूर्वीच याची माहिती देण्यात आली. शाओमी Mi4 च्या ६४ जीबी स्मार्टफोनच्या किंमतीत तब्बल ४ हजारांची रुपयांची कपात करण्यात आली आहे.

यापूर्वी शाओमीचा ६४ जीबीचा हा स्मार्टफोन २३,९९९ रुपयात मिळत होता. पण आता हा स्मार्टफोन १९,९९९ रुपयात उपलब्ध आहे. ऑनलाइन शॉपिंग
वेबसाइट फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध असून कोणत्याही नोंदणीविषय आता तुम्हाला मिळू शकतो. तसेच एक्सचेंज ऑफरमध्ये या फोनची किंमत १४,९९९ एवढी असणार आहे.

Leave a Comment