कॅपिटल लेटर्समध्ये लिहा प्रिस्क्रिप्शन

doctor
नवी दिल्ली- आतापर्यंत शेकडो विनोद डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवरील हस्ताक्षरावर केले गेले असून डॉक्टरांच्या अनाकलनीय हस्ताक्षराचे रहस्य केमिस्ट शिवाय कुणालाच कळत नाही हे तितकेच खरे आहे. पण त्याचा नाहक त्रास कित्येक रुग्णांना होत असे.

पण आता तुम्ही स्वतः आता प्रिस्क्रिप्शन वाचू शकाल आणि ते सुद्धा अगदी स्पष्टपणे. जे प्रिस्क्रिप्शन रुग्णांना देण्यात येईल ते कॅपिटल लेटर्समध्ये असावे असा नियम केंद्र सरकार लवकरच काढणार असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डी. के. अग्रवाल यांनी दिली आहे. या निर्णयाचे स्वागत देशभरातील डॉक्टरांनी केले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. डॉक्टर लोकांना थोडेसे जास्त कष्ट घ्यावे लागतील परंतु ही बाब जनतेच्या हिताचीच आहे असे ते म्हणाले. डॉक्टरांचे हस्ताक्षर न वाचता आल्याने गैरसमजातून चुकीचे औषध दिले गेल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्या दृष्टीने हे अत्यंत उपयोगी पाऊल उचलण्यात आले असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment