मोटोरोलाचा मोटो जी थर्ड जनरेशन जुलैत भारतात

motog
मोटोरोलाने त्यांच्या स्वस्त आणि मस्त मोटो जी सेकंड जनरेशनला मिळालेल्या अपूर्व प्रतिसादानंतर मोटो जी थर्ड जनरेशन लाँच करण्याची तयारी केली असून हा फोन जुलैत भारतात दाखल होईल असे संकेत दिले जात आहेत. कंपनीने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नसली तरी फ्लिपकार्टवर त्याची माहिती व फिचर्स लिक झाले आहेत.

या स्मार्टफोनसाठी पाच किंवा ५.२ इंचाचा फुल एचडी स्क्रिन,२ जीबी रॅम, ८ एमपीचा ऑटोफोकस एलईडी फ्लॅशसह रियर कॅमेरा,५ एमपीचा फ्रंट कॅमेरा, ८ जीबी इंटरनल मेमरी ती कार्डच्या सहाय्याने ३२ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, फोर जी, एलटीई, थ्रीजी, वायफाय, ब्ल्यू टूथ, मायक्रो यूएसबी, जीपीएस कनेक्टीव्हीटी, एफएम सुविधा असेल. फोनची किमत १२ ते १५ हजारादरम्यान असेल असे संकेत दिले जात असून तो पांढरा व काळ्या रंगात उपलब्ध करून दिला जाईल असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment