अंतराळात शूट होणार पोर्नफिल्म

porn
लंडन- अॅडल्ट वेबसाईट पॉर्नहब अंतराळात पहिलीवहिली पोर्नफिल्म शूट करण्याच्या तयारीत असून पृथ्वीच्या खालच्या थरात हे शूटिंग केले जाईल. त्यासाठी स्पेश मिशनची तयारीही केली जात आहे. सेक्सप्लोरेशन या नावाने हे मिशन आखले जात आहे आणि त्याच्या प्री व पोस्ट प्रॉडक्शनचा खर्च पोर्नहब करणार आहे मात्र त्याचवेळी त्यांनी गुंतवणुकदारांनाही आवाहन केले आहे. गुंतवणुकदारांकडून त्यांना ३४ लाख डॉलर्स गुंतवणुकीची अपेक्षा आहे. हे शूटिंग कांही कारणाने झाले नाही तर गुंतवणकदारांना पैसे परत केले जातील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

अॅडल्ट एन्टरटेनमेंट मध्ये पोर्नहब हे लोकप्रिय नाव आहे आणि या साईटला वर्षभरात १६ अब्जांवर व्हिजिट होतात. सिनेमाच्या स्क्रीप्टवर काम सुरू झाले आहे आणि यात प्रसिद्ध पोर्नस्टार इवा लोविया व जॉनी सिन्स ही जोडीच दिसणार आहे. त्यांना शूटिंगपूर्वी सहा महिन्याचे कडक प्रशिक्षण दिले जाणार आहे.

पोर्नहबमधील सूत्रांकडून असे सांगितले गेले की मानव आता अंतराळात वसाहत करण्याच्या दिवसापासून फार दूर नाही. अशावेळी अंतराळातही सेक्स या जीवनाच्या महत्त्वाच्या पैलूवर प्रकाश पडायला हवा, त्यासाठी आवश्यक असल्यास संशोधन व्हायला हवे असाही या चित्रपटामागचा उद्देश आहे. यापूर्वी असा प्रयत्न झालेला नाही.

Leave a Comment