बँकेत खाते उघडणे झाले सोपे, नियम शिथिल

rbi
मुंबई – रिझर्व्ह बँकेने बँकेत खाते उघडण्यासाठीचे अनेक नियम शिथिल केले असून आता रहिवासी पुराव्यासाठी वीज, टेलिफोन किंवा पोस्टपेड मोबाईल बिल दिले तरी चालणार आहे.

फक्त दोन महिन्यांहून अधिक जुने आपले बिल नसावे. या बॅंकेचे अथवा पोस्ट ऑफिसचे अकाउंट स्टेटमेंट देखील पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे. मालमत्ता कर, नगरपालिका कर पावत्या देखील आता रहिवासी पुरावा म्हणून स्वीकारल्या जाणार आहेत. बॅंकेत खाते उघडण्यासाठी पाइप गॅस किंवा पाणी बिलाचा पुरावा देखील ग्राह्य धरला जाईल. या शिवाय सरकारी कर्मचाऱ्यांची निवृत्ती वेतन पावती पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाईल.