
मुंबई – तुम्ही तुमच्या ३ जी डेटा पॅकचा पूर्ण उपयोग करू शकत नसल्यास राहिलेला डेटा आता पुढील महिन्यातही वापरता येणार असल्याची सुविधा आयडिया कंपनी देत आहे. पोस्टपेड ग्राहकांसाठी आयडियाने ‘३ जी रोलओवर’ हे फिचर बाजारात आणले असून आयडियाच्या ग्राहकांना हा लाभ विनाशुल्क घेत येणार आहे.
आयडियाने आणले ‘३ जी रोलओवर’ फिचर
याबाबत माहिती देताना आयडियाचे मुख्य विपणन अधिकारी शशि शंकर म्हणाले की, ग्राहकांची डेटा पॅक असूनही त्याची तारखी संपल्यानंतर निराशा होत असल्यामुळे आम्ही ‘३ जी रोलओवर’ बाजारात आणले. यामुळे ग्राहकांचे समाधन होणार आहे. त्यांना राहिलेला डेटा वापरता येणार आहे. ही सेवा ओडिशाला सोडून देशभरात कमीत कमी १ जीबी डेटा पॅकवर सुरू होणार आहे.
