फोर्ड इंडियाची इकोस्पोर्ट अमेरिकेत दाखल होणार

ford
अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी फोर्ड इंडिया कंपनीने त्यांच्या इकोस्पोर्ट यूएसव्ही सुरू केलेल्या प्रयत्नांना यश आले असून आक्टोबर २०१७ पासून ही गाडी अमेरिकेत निर्यात केली जाणार आहे. इकोस्पोर्ट ही फोर्डची लोकप्रिय एसयूव्ही आहे आणि या गाडीच्या निमित्ताने प्रथमच मेड इन इंडिया कार अमेरिकेच्या बाजारात दाखल होत आहे.

यापूर्वी महिद्राने त्यांची स्कॉर्पिओ पिक अप व्हर्जन अमेरिकेत निर्यातीसाठी प्रयत्न केले होते मात्र ते यशस्वी होऊ शकले नव्हते. रॉयल एनफिल्ड, केटीएस या मोटरसायकली आणि महिद्राचे ट्रॅक्टर अमेरिकन बाजारात यापूर्वीच विकले जात आहेत. फोर्डनेही त्यांची कॉम्पॅक्ट वाहने युरोपिय बाजारात यापूर्वीच निर्यात केली आहेत. मात्र अमेरिकन मार्केटसाठी फोर्ड इंडियाला फोर्ड थायलंडबरोबर कडी स्पर्धा करावी लागणार आहे.

फोर्ड इंडियातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नॉर्थ अमेरिकन मार्केटमध्ये फोर्ड इंडिया एसयूव्हीचे फेस लिफटेड व्हर्जन तयार करण्यावर काम सुरू झाले आहे. त्यासाठीची टेंडर प्रक्रियाही सुरू आहे. कोटेशन रिक्वेस्टप्रमाणे वर्षाला ९० हजार गाड्या निर्यात होणे अपेक्षित आहे. गेल्या १० वर्षात फोर्डने भारतात २ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केलेली आहे मात्र तुलनेने स्थानिक बाजारात मागणी कमी असल्याने निर्यातीचा निर्णय घेतला गेला आहे.

Leave a Comment