पेट्रोल-डिझेलचे भाव कमी होण्याची शक्यता

petrol
नवी दिल्ली : तेल कंपन्यांनी १५ मे २०१५ ला पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढविले होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत पाच डॉलर प्रति बॅरलने घट झाली होती. पण आगामी पंधरावड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होण्याची शक्यता असल्यामुळे पेट्रोलच्या किंमती तीन रूपये आणि डिझेलच्या किंमतीत अडीच रूपये घट होऊ शकते. आता प्रति बॅरल किंमत ५९ डॉलर झाली आहे. या पुढेही क्रुड ऑइलच्या किंमती कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात य़ेत आहे.

Leave a Comment