भावना चाळविल्या म्हणून चिनी अभिनेत्रीवर दावा

xio-vei
चीनमधील बहुचर्चित व लोकप्रिय अभिनेत्री झाओ वेई हिला एका अनोख्या दाव्यामुळे न्यायालयाच्या फेर्‍या मारण्याची पाळी आली आहे. शाघायमधील एका व्यक्तीने वेईने टिव्ही मालिकेतील कार्यक्रमातून त्याच्याकडे कामुक नजरेने पाहिल्याने त्याचे मन चाळविले गेले असल्याचा आरोप वेईवर लावून तिच्याविरोधात केस दाखल केली आहे. विशेष म्हणजे चीनमध्ये १ मे पासून केल्या गेलेल्या नव्या नियमानुसार कोणत्याही कोर्टाला त्यांच्याकडे दाखल झालेला कोणताही अर्ज सहजी फेटाळता येणार नाही. परिणामी गेल्या १ महिन्यात न्यायालयातील दाव्यांत २९ टक्के वाढ नोंदविली गेली आहे.

वेई मे पासून सुरू झालेल्या टायगर मॉम या टिव्ही सिरीयलमध्ये एका मुलीच्या आईची भूमिका करते आहे. ही आई मुलीला कडक बंधनांत ठेवणारी आहे तर पिता मुलीला स्वांतत्र्य देण्याच्या विचाराचा आहे. या सिरीयलमध्ये एका दृष्यात वेईची रोखलेली नजर दावा दाखल करणार्‍या व्यक्तीला खूपच कामुक वाटली व त्यामुळे त्याचे मन चाळविले गेल्याचे कारण दिले गेले आहे. टिव्ही मालिकेच्या निर्मात्यांनी मात्र हा दावा म्हणजे सर्वसामान्यांना दिलेल्या अधिकाराचा दुरूपयोग असल्याचे मत व्यक्त केले आहे.

Leave a Comment