टीसीएसचे चंद्रशेखरन याना १४ टक्के पगारवाढ

tcs
भारतातील अग्रणी सॉफटवेअर सेवा फर्म टाटा कन्सल्टन्सीचे सीईओ व व्यवस्थापकीय संचालक चंद्रशेखरन यांना २०१४-१५ सालात १४ टक्के पगारवाढ मिळाली असून त्यांना या आर्थिक वर्षात २१.२८ कोटी रूपये पगार मिळाला असल्याचे समजते. गतवर्षी त्यांना १८.६८ कोटी रूपये पगार मिळाला होता.टाटा कन्सल्टन्सीने त्यांच्या वार्षिक अहवालात हे नमूद केले आहे. या अहवालानुसार चंद्रशेखरन यांना १.७९ कोटी रूपये पगार, १६ कोटी रूपये कमिशन, ८६.६१ लाख रूपयांचे अन्य अलौन्स दिले गेले आहेत शिवाय त्यांच्याकडे टीसीएसचे ८८५२८ शेअर्स आहेत.

या तुलनेत टीसीएसचे प्रमुख वित्त अधिकारी गोपीनाथ यांना २.१४ कोटीचे पॅकेज दिले गेले आहे तर इन्फोसिसचे सीईओ विशाल सिक्का यांना ४.५६ कोटी रूपये पगार मिळाला आहे. भारतातील ३ नंबरवर असलेली सॉफ्टवेअर सेवा कंपनी विप्रोचे टी. के. कुरियन यांना ९.३ कोटी रूपये पगार मिळाला आहे.