मराठी मुलीची उर्दू विषयात बाजी

borli1
रायगड : समृध्दी वाघमारेने या विद्यार्थिनीने देशातील हिंदू-मुस्लिम ऐक्यात द्वेष पेरणा-यांना खरा अर्थाने चपराक लागून नवा एयाम निर्माण केला आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्याच्या बोर्ली पंचतन गावात ए.आर. उंद्रे विद्यालयात दहावीत शिकणा-या समृद्धी वाघमारे या मुलीने उर्दू विषयात शाळेत पहिली येण्याचा मान पटकावला आहे.

borli

विशेष म्हणजे आयसीएसई बोर्डाच्या परीक्षेत शाळेत पहिल्या आलेल्या मधिआ मुआझम या विद्यार्थीनीपेक्षाही समृद्धीला उर्दूत दोन गुण जास्त मिळाले आहेत. उर्दूत चांगली कामगिरी करणारी समृद्धी ही एकमेव नसून याच शाळेच्या हर्षदा चेरफळे, सिमरन कारंबे आणि क्षितीज खोपकर या विद्याथ्र्यांनाही उर्दू विषयात चांगले गुण मिळाले आहेत. सर्वसाधारणपणे दहावीच्या परीक्षेत उर्दू विषय घेण्याकडे फार कमी विद्याथ्र्यांचा कल असतो. पण दहावीसाठी चांगले गुण मिळवायचे असतील तर उर्दू हा विषय खुप फायदेशीर ठरतो असे समृद्धीचे म्हणणे आहे. याचसोबत उर्दू भाषेतील लिखाण आणि त्यांचे लेखक या विषयीही जास्त माहिती या अभ्यासादरम्यान मिळाल्याचे समृद्धीने सांगितले. याआधीही मरिअम सिद्दीकी या तरुणीने गीतापठण स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावून एक वेगळा आदर्श निर्माण केला होता. आता रायगड जिल्ह्यातल्या या विद्याथ्र्यांच्या कामगिरीमुळे धर्मावरून राजकारण करणा-यांच्या डोळ्यात चांगलेच अंजन घातले गेले असेल असे म्हणावे लागेल.

Leave a Comment