वर्षअखेर जगातील निम्मी लोकसंख्या इंटरनेट कनेक्ट होणार

inter
या वर्षअखेर जगातील अर्धी लोकसंख्या इंटरनेटने जोडलेली असेल असा अहवाल संयुक्त राष्ट्र संघाच्या आंतर राष्ट्रीय टेलिकम्युनिकेशन युनियन संस्थेने दिला आहे. या अहवालानुसार आत्ताच ३.२ अब्ज नागरिक इंटरनेट कनेक्ट झालेले आहेत वर्षअखेरी त्यात अजून भर पडेल. सध्या जगाची लोकसंख्या आहे ७.२ अब्ज. सध्या इंटरनेट कनेक्ट असलेल्यात विकासशील देशातील २ अब्ज नागरिक आहेत.

सर्वात कमी विकसित देशांच्या यादीतील नेपाळ व सोमालियातही ८ कोटी ९० लाख नागरिक इंटरनेटचा वापर करू शकतील असेही या अहवालात नमूद केले गेले आहे. वर्षाअखेरी विकसित देशांतील ८० टक्के घरे व विकसनशील देशातील ३४ टक्के घरातून कोणत्या ना कोणत्या स्वरूपात इंटरनेट असेल असाही अंदाज दिला गेला आहे. गेल्या १५ वर्षात जागतिक विकासात इंटरनेटने फारच मोठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

२००० साली इंटरनेट कनेक्ट लोकांची संख्या ४० कोटी होती. मोबाईल ब्रॉडबँड धारकांची संख्या कांही काळात ७ अब्जांवर जाईल असेही यात नमूद केले गेले आहे. अमेरिका व युरोप मध्ये दर १०० मागे ७८ मोबाईल बॉ्रडबँड युजर आहेत तसेच ६९ टक्के लोकांकडे थ्रीजी कव्हरेज आहे.

Leave a Comment