फिकॉमचा फिकॉम पॅशन ६६० स्मार्टफोन

phicomm
भारतीय बाजारात चीनी स्मार्टफोन निर्मात्या कंपन्यांचा हिस्सा वाढत चालला आहे. दोन महिन्यांपूर्वीच दोन चिनी कंपन्यांनी भारतीय बाजारात प्रवेश केल्यानंतर आता फिकॉम या चिनी स्मार्टफोन निर्मात्या कंपनीनेही त्यांच्या फिकॉम पॅशन ६६० फोर जी एलटीई या स्मार्टफोनसह भारतीय बाजारात पाऊल टाकले आहे. हा फोन अॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध केला गेला आहे आणि त्याची किंमत आहे १०९९९ रूपये.

या फोनला पाच इंची फुल एचडी डिस्प्ले दिला गेला आहे. २ जीबी रॅम, ड्युअल सिम, १६ जीबी इंटरनल मेमरी ती कार्डच्या सहाय्याने ६४ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, एलईडी फ्लॅशसह १३ एमपीचा रियर तर ५एमपीचा फ्रंट कॅमेरा, अँड्राईड किटकॅट ओएस, लॉलीपॉप व्हर्जनमध्ये अपग्रेड करण्याची सोयही दिली गेली आहे. ब्ल्यूटूथ, वायफाय जीपीएस कनेक्टीव्हीटी या फोनसाठी दिली गेली आहे. काळा व पांढरा अशा दोन रंगात तो उपलब्ध आहे.

Leave a Comment