पोस्ट खातेधारकांना डेबिट कार्डे मिळणार

post
पोस्ट विभागाने आपल्या खातेदारांना डेबिट कार्ड देण्यासाठी सीएमएस इंन्फो सिस्टीमबरोबर करार केला असून त्यानुसार येत्या तीन वर्षात ही कंपनी १.५ कोटी पोस्ट खातेदारांना डेबिट कार्ड देणार आहे. त्यासाठी कंपनीला ३० कोटी रूपये दिले जाणार आहेत. बुधवारी या संदर्भातील घोषणा करण्यात आली आहे.

आजही भारतात पोस्टातील खातेदारांची संख्या १० कोटींच्या घरात आहे. पोस्ट विभागातर्फे एटीएमही लावली जात आहेत आणि पोस्टाने सीएमएस इन्फोला रूपे कार्ड पुरविण्याचे कंत्राट दिले आहे असे सांगून या कंपनीचे प्रमुख मोकन सिंह मट्टा म्हणाले की खातेधारकांना डेबिट कार्ड दिले गेले तर पोस्टाच्या एटीएम योजनेला ते अतिशय पुरक ठरणार आहे. हे डेबिट कार्ड राष्ट्रीय भुगतान निगमच्या प्लॅटर्फार्मवर दिले जाईल आणि सुरवातीला ते फक्त पोस्टाच्या एटीएमसाठीच वापरता येईल. मात्र नंतर टप्प्याटप्प्याने ते अन्य एटीएमवरही वापरता येईल.

Leave a Comment