सोमनाथ मंदिरात हिंदूशिवाय इतरधर्मियांना प्रवेश नाही!

somnath
वेरावल (गुजरात)- यापुढे फक्त हिंदूंनाच पवित्र ज्योतिर्लिंग सोमनाथ येथील मंदिरात प्रवेश मिळणार असून इतर धर्मातील लोकांना मंदिरात प्रवेश करायचा असेल तर मंदिर ट्रस्टच्या कार्यालयाची विशेष परवानगी घ्यावी लागणार आहे. ही सूचना मंदिर परिसरात लावलेल्या बोर्डवर लिहण्यात आली आहे.

ही सूचना गुजराती भाषेत लिहीली असून श्री सोमनाथ ज्योतिर्लिंग तीर्थधाम हे फक्त हिंदुंचे तीर्थधाम आहे. या पवित्र तीर्थधाममध्ये इतर धर्मिय लोकांना दर्शन अथवा प्रवेश करायचा असेल तर जनरल मॅनेजर ऑफिसशी संपर्क साधून परवानगी घेण्यात यावी. परवानगी मिळाल्यानंतरच मंदिरात प्रवेश दिला जाईल. श्री सोमनाथ ट्रस्ट प्रभास पाटण असे स्पष्टपणे लिहिण्यात आले आहे.

Leave a Comment