सॅमसंगचा गॅलक्सी कोअर प्राइम ४जी लाँच

samssung
मुंबई: कोरिअन मोबाइल कंपनी सॅमसंगने गॅलक्सी कोअर प्राइम ४जी स्मार्टफोन बाजारात लाँच केला आहे. मार्चमध्येच सॅमसंग गॅलक्सी कोअर प्राइम ४जी हा स्मार्टफोन लाँच करणार होती पण काही कारणास्तव या फोनचे लाँचिंग पुढे ढकलण्यात आले होते.

स्मार्टफोनच्या बाजारात या फोनची किंमत ९,९९९ रुपये असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ३ जीबीचा ४जी डेटा या स्मार्टफोनमध्ये मोफत मिळणार असून त्याचबरोबर तीन महिन्यांसाठी हंगामा चॅनलचे सब्सक्रिशनही मिळणार आहे.

काय आहेत सॅमसंग गॅलक्सी कोअर प्राइम ४जीचे खास वैशिष्ट्ये – यात ४८०x८०० पिक्सल रेझ्युलेशनचा ४.५ इंच डिस्प्ले, ड्युल सिम सपोर्ट, ४जी नेटवर्क सपोर्ट, ४.४ किटकॅट ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉईड, प्रोसेसर १.२ GHz क्वॉड कोअरचा, रॅम १ जीबी, इंटरनल मेमरी ८ जीबी आणि मायक्रोकार्डद्वार ६४ जीबीपर्यंत मेमरी वाढवू शकतो. ५ मेगापिक्सल एलईडी फ्लॅश रिअर कॅमेरा, फ्रंट कॅमेरा २ मेगापिक्सलचा आहे तर बॅटरीची क्षमता २००० mAh एवढी आहे.

Leave a Comment