
मुंबई : आपल्या न्यूज फीडमध्ये एका नव्या फीचरचा फेसबुकने समावेश केला असून आतापर्यंत ग्राफिक इंटरचेंज फॉरमॅटमधील (GIF) इमेज फेसबुकवर पोस्ट करता येत नव्हते, मात्र आता ते शक्य होणार आहे.
फेसबुकवर आता GIF इमेजही करु शकता पोस्ट
अनिमेटिड GIF सपोर्ट फेसबुकवर करु शकणार आहे, अशी माहिती फेसबुकच्या प्रवक्त्यांनी दिल्यामुळे यापुढे युजर्स आपल्या मित्रांना जीआयएफ इमेज शेअर करु शकणार आहेत. या नव्या फीचरचे अपडेट अद्याप सुरु झाले नसून या फीचरचा वापर करायचा असल्यास जिफी, इमगर, टम्बलर सारख्या वेबसाईट्सवरुन स्टेटस अपडेट ऑक्समध्ये इमेज पेस्ट करु शकतात आणि पब्लिश करु शकतात.
GIF इमेज करंट ऑटो प्ले सेटिंग्जसोबत फेसबुकवर ऑटो प्ले होऊ शकणार आहे. मात्र जर तुमच्या फेसबुक अकाऊंटच्या सेटिंग्जमध्ये डिझेबल ऑटो प्ले असे असेल, तर जीआयएफ इमेजवर क्लिक करावे लागेल.
