
नवी दिल्ली- परदेश दौरे, निष्क्रीय बॅँक खात्यांची माहिती मागणारा वादग्रस्त प्राप्तिकर विवरणपत्र केंद्रीय अर्थखात्याने रद्द करून रिटर्न भरण्यासाठी तीन पानांचा नवीन फार्म प्राप्तिकरदात्यांसाठी जारी केला. तसेच यंदा प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची मुदत सरकारने ३१ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे.
३१ ऑगस्टपर्यंत प्राप्तिकर भरण्याच्या मुदतीत वाढ
‘आयटीआर २’ आणि ‘आयटीआर २ ए’ हे दोन्ही नवीन फार्म केवळ तीन पानांचे आहेत. या फॉर्ममध्ये प्राप्तिकर दात्यांना आपली सर्व बॅँक खाती व पासपोर्टचा क्रमांक नमूद करावा लागणार आहे. प्राप्तिकर दात्यांनी आपली अन्य माहिती गरज भासल्यास अन्य कागदपत्रांद्वारे जोडायची आहे.
‘आयटीआर २ ए’ हा फॉर्म वैयक्तिक प्राप्तिकर दात्यांसाठी किंवा हिंदू अविभक्त कुटुंबासाठी आहे. उद्योग, शेअर बाजारातून उत्पन्न नसलेल्या, परदेशी संपत्तीतून उत्पन्न नसलेल्या व्यक्तींना हा फॉर्म भरायचा आहे. परदेश दौ-यांचा तपशील जाहीर करण्याची आवश्यकता नाही. केवळ पासपोर्ट क्रमांक या फॉर्ममध्ये दिला तरी चालणार आहे, असे अर्थखात्याने जाहीर केले.
