यापुढे एचडीएफसीच्या एटीएममधून पेपर स्लिप नाही मिळणार

hdfc
नवी दिल्ली : खासगी क्षेत्रीतील दुसरी मोठी बँक एचडीएफसीने ग्राहकांना ट्रान्झॅक्शननंतर मिळणारी स्लिप न देण्याचा निर्णय घेतला असून ग्राहकांना एटीएममधून मिळणाऱ्या स्लिपऐवजी एसएमएसमधूनच विस्तृत माहिती बँकेकडून मिळेल. याबाबत अधिक माहिती देताना बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पैसे काढल्यानंतर पेपर स्लिप न देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. ग्राहकांना एसएमएसद्वारे काढलेल्या पैशांचा आणि अकाऊंटमधील बॅलन्सची माहिती कळवली जाईल. बँकेने सध्या काही एटीएममध्ये ही योजना लागू केली आहे. जूनअखेरीस सर्व ११,७०० एटीएममध्ये या निर्णयाची अंमलबजावणी होईल.

Leave a Comment