
टोरांटो : शास्त्रज्ञांनी रक्तस्राव होऊन ताप येण्यास कारणीभूत ठरणा-या इबोलासारख्या विषाणूचा प्रतिकार करू शकणा-या औषधाचा शोध लागल्याचा दावा केला असून या विषाणूचा फैलाव जलदगतीने होत असल्यामुळे मानवी आरोग्यावर त्याचा घातक परिणाम होत आहे.
इबोलासारख्या विषाणूचा प्रतिकार करू शकणा-या औषधांचा शोध
इबोलासारख्या संसर्गजन्य आजारावर जालीम उपचार व औषध पद्धती विकसित झाली नाही. मर्यादित आर्थिक स्रोत असणा-या विकसनशील देशांमध्ये या संसर्गाचा उद्रेक होतो. अशा विषाणूंचा संसर्ग वेगाने होतो आणि त्याचा रोगप्रतिकार शक्तीवर विपरीत परिणाम होतो. आमचे संशोधन विषाणूवरील अल्पमुदतीच्या उपचार पद्धतीशी संबंधित नाही. मात्र, याचा उपयोग लस विकसित करण्यासाठी होऊ शकतो, असे युनिव्हर्सिटी ऑफ मोन्त्रेयलमधील प्रमुख संशोधक नॉर्मंड क्यार यांनी सांगितले. रक्तस्रावाशी संबंधित रिफ्ट व्हॅली फीव्हर विषाणूवर आणखी संशोधन केल्यास जीवघेण्या विषाणू संसर्गावर उपचार पद्धती विकसित होऊ शकते, असे क्यार म्हणाले. संबंधित विषाणूच्या व्हायरल प्रोटीनवर अभ्यास करण्यासाठी संशोधकांनी न्यूक्लिअर मॅग्नेटिक रिझोनन्स (एनएमआर) स्पेक्त्रोस्कोपीचा उपयोग केला.
Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही
