अरूण पुदूर आशियाई श्रीमंतांच्या यादीत अव्वल!

pudur
न्यूयॉर्क : तंत्रज्ञान उद्योजक अरूण पुदूर यांचा आशियातील वयाच्या चाळिशीपर्यंतच्या गटातील श्रीमंत व्यक्तींमध्ये पहिला क्रमांक लागला आहे. ‘वेल्थ एक्स’ या जागतिक संपत्तीविषयक कंपनीने म्हटले आहे की, पुदूर हे ‘सेलफे्रम’ या सॉफ्टवेअर कंपनीचे अध्यक्ष असून त्यांची संपत्ती ४ अब्ज डॉलर आहे. पुदूर हे ३७ वर्षांचे असून चेन्नईचे रहिवासी आहेत. त्यांनी १९९८ मध्ये ‘सेलफे्रम’ ही कंपनी स्थापन केली. विद्यापीठातून पदवीधर झाल्यानंतर त्यांनी स्थापन केलेली ही कंपनी मायक्रोसॉफ्टच्या खालोखाल दुस-या क्रमांकाचे वर्ड प्रोसेसर बनवते. स्थावर मालमत्ता व खाण उद्योगातही त्यांची गुंतवणूक आहे.

पुदूर यांच्यानंतर झाऊ याहुई या चीनच्या व्यक्तीचा दुसरा क्रमांक असून त्यांची संपत्ती २.२ अब्ज डॉलर्स आहे. चीनचे यादीवर प्रभुत्व असून त्यांच्या सहा उद्योजकांचा पहिल्या दहात समावेश आहे. जपानचे तीन जण यात आहेत. यातील नऊ उद्योजकांनी तंत्रज्ञान क्षेत्रात काम करून मालमत्ता मिळवली आहे.

Leave a Comment