
नवी दिल्ली : आपत्कालीन परिस्थितीमध्ये अनेक वेळा आपल्याला प्रवास करायचा असतो. ज्याबद्दल आपण आधी ठरवलेले नसते आणि वेळेवर आपल्याला रेल्वेचे तिकीट मिळत नाही. मात्र आता लवकरच आपली या समस्येतून सुटका होणार आहे. भारतीय रेल्वे लवकरच आपली तात्काळ स्पेशल रेल्वे सुरू करणार आहे. ही रेल्वे केवळ बिझी सिझनमध्ये चालवली जाईल आणि या प्रवासासाठी आपल्याला आपला खिसा जरा जास्त रिकामा करावा लागेल.
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर… बिझी सिझनमध्ये धावणार स्पेशल ट्रेन
रेल्वे मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक संकटाशी लढणा्या रेल्वेने वेगळा मार्ग स्वीकारला आहे. तात्काळ भाड्याच्या आधारे ही विशेष रेल्वे चालवली जाईल. आता प्रिमियम (दुरांतो एक्सप्रेस) मध्ये रेल्वेचे भाडे याआधारे ही सेवा सुरू आहे. नवीन तात्काळ रेल्वे सुरू झाल्यास गर्दीच्या वेळी प्रवाशांचा जास्त सुविधा मिळेल. या तात्काळ रेल्वेमध्ये प्रवाशांचा सामान्य भाड्यापेक्षा जास्त भाडे द्यावे लागेल. ते १७५ ते ४०० रुपयांदरम्यान असेल.
आधिका-याने सांगितले की, आता द्वितिय श्रेणीसाठी तात्काळचे भाडे हे सामान्य दराच्या १० टक्के जास्त आहे. याशिवाय एसी आणि इतर श्रेणींमध्ये हे भाडं ३० टक्के अधिक आहे. प्रिमियम रेल्वेसाठी फक्त ऑनलाइन तिकीट बुक केले जावू शकते. मात्र तात्काळ स्पेशल टड्ढेनसाठी तिकीट ऑनलाइन आणि काउंटर दोन्ही ठिकाणी उपलब्ध असेल.
