आता लँडिंग, टेकऑफ वेळी वापरता येणार मोबाईल

mobile
वॉशिंग्टन : अमेरिकेतील न्यायालयाने अमेरिकी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या सूत्रांना विमानाच्या टेक ऑफ आणि लँडिंगच्या वेळी प्रवाशांना मोबाइल आणि इतर इलेक्ट्रोनिक वस्तूंचा वापर करण्याची परवानगी देण्यात यावी असा आदेश दिला आहे.

अमेरिकेत विमान प्रवासी संघटनेने २०१३ मध्ये दिलेल्या एका निर्णयाला आव्हान देणा-या याचिकेवर हा आदेश देण्यात येणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव विमानाच्या लँडिंग आणि टेक ऑफ वेळी मोबाइल वापरण्यास बंदी आणणारा आदेश यापूर्वी देण्यात आला होता. मात्र, या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर याबाबत असणा-या नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहेत.

विमानाच्या सुरक्षिततेबाबत फेडरल अ‍ॅव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रशन ठरवून दिलेल्या नियमावलीच्या माध्यमांतून विमानाची सुरक्षितता तपासण्यात येणार आहे. त्यानंतर प्रवाशांना मोबाइल आणि इतर इलेक्ट्रोनिक वस्तू वापरण्याची परवानगी असणार आहे. दरम्यान, मोबाइल आणि टॅब वगळून इतर कोणत्याही इलेक्ट्रोनिक उपकरणाचा थेट परिणाम विमानाच्या सुरक्षिततेवर होणार नसल्याने या वस्तूंच्या वापराला परवानगी देण्यात आली आहे.

Leave a Comment