वीज आणि चार्जरशिवाय फोन होणार चार्ज

charging
मोबाईल वापराचे प्रमाण अधिकाधिक वाढत चालल्याने हे फोन वारंवार चार्ज करावे लागतात आणि त्यासाठी प्लग, चार्जर हवेतच. अगदी कुठेही फोन चार्ज करायचा असला तरी निदान पोर्टेबल चार्जर तरी हवाच. आता या झंझटातून युजरची सुटका लवकरच होणार आहे. वैज्ञानिकांनी फोन चार्जिंगसाठी नवे तंत्रज्ञान शोधले आहे आणि त्यासाठी वीज अथवा चार्जर नको तसेच प्लगचीही आवश्यकता नाही.

टेक क्रंच ने दिलेल्या अहवालानुसार निकोला लॅब आणि ओहियो स्टेट युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी मिळून हे नवे तंत्रज्ञान शोधले आहे. यात एक केस आहे जी फोनचा सिग्नल शोधते आणि खर्ची पडलेली एनर्जी फोनमध्ये पुन्हा लोड करते. हे काम रेडिओ फ्रिक्वेन्सीला पॉवर मध्ये बदलून केले जाते. या तंत्रज्ञानाने फोनची खर्ची पडलेली ९० टक्के एनर्जी पुन्हा स्टोअर करता येते. परिणामी फोन ३० टक्के अधिक काळ चालू शकतो. यंदाच्या वर्षात हे उत्पादन बाजारात दाखल होणार आहे.

हे तंज्ञत्रान वेअरेबल टक्नॉलॉजी, एम्बेडेड सेन्सर्स, मेडिकल उपकरणे अशा ज्या उपकरणांना जादा विजेची गरज नसते त्यात वापरता येणार आहे.

Leave a Comment