राहुल गांधींची सोशल मीडियावर एंट्री

rahul
मुंबई: ५६ दिवसांच्या सुट्टीवरुन परतल्यानंतर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे राजकारणात चांगलेच सक्रिय झालेले दिसून आले. आतापर्यंत सोशल मीडियापासून दूर राहणाऱ्या राहुल गांधी यांनी ट्विटरवर आपले अकांऊट सुरु केले आहे.

केदारनाथ पदयात्रा, जनरल डब्यातून रेल्वे प्रवास, लोकसभेत अनेक मुद्द्यांवर आक्रमकपणे भाषणं यासारख्या गोष्टींनंतर आता राहुल गांधी सोशल मीडियावरही अक्टिव्ह दिसून येतील. राहुल गांधींनी ट्वीटरवर @OfficeofRG ट्विटर हँडल सुरु केले आहे. मात्र, आपल्या ट्विटरवरुन त्यांनी अद्यापपर्यंत एकही ट्वीट केलेले नाही. आतापर्यंत राहुलचे ८००० फॉलोअर्स देखील झाले आहेत.

Leave a Comment