
आयफोन सिक्स व प्लसच्या तडाखेबंद विक्रीनंतर अॅपल त्यांच्या नव्या स्मार्टफोन लाँचिंगच्या तयारीत असल्याचे वृत्त असून हा नवा फोन आत्तापर्यंतच्या कंपनीच्या सर्व फोनमध्ये जादा पॉवरफुल असेल आणि आयफोन सेव्हन या नावानेच तो बाजारात येईल असे सांगितले जात आहे. अॅपलच्या दरवषी सप्टेंबरमध्ये होत असलेल्या इव्हेंटमध्ये आयफोन सेव्हन आणि प्लस सादर केले जातील असा अंदाज वर्तविला जात आहे.
आयफोन सेव्हन सप्टेंबरमध्ये ?- लिक झाले फिचर्स
आयफोन सेव्हन संदर्भातल्या अफवा आत्तापासूनच वेगाने पसरत आहेत. त्याची फिचर्स आणि फोटोही इंटरनेटवर लीक झाले आहेत. जाणकारांच्या मते आयफोन सेव्हन अधिक मोठ्या स्क्रीनचा असेल आणि फिचर्सही अधिक चांगले असतील. या फोनसाठी ५.५ इंचाचा सफायर ग्लास डिस्प्ले हायर रेझोल्युशन सह दिला जाईल. याचा वापर प्रथम आयफोन वॉचमध्ये केला गेला आहे. कर्व्ह बॉडीचा हा फोन डीएसएलआर कॅमेर्यासह येईल. यासाठी कंपनीने एका कंपनीशी १२७ कोटींचे डील केले असल्याचेही सांगितले जात आहे. यामुळे पोस्ट शूट रिफोकसिंग आणि थ्रीडी मॉडेलिंग सुविधा मिळू शकणार आहे.
या फोनसाठी सॅमसंग ए ९ चिपसेट बनवित असल्याचेही समजते. फोनला यूएसबी-सी कनेक्टीव्हीटी, आयओएस ९ ओएस असेल आणि हा फोन ३२, ६४ व १२८ जीबी मेमरीसह येईल असेही अंदाज वर्तविले जात आहेत. त्यांच्या किमती अनुक्रमे ५६ हजार, ६१ हजार व ६६ हजार रूपये असतील.
