खमंग खुसखुशीत पुदिना पुरी

pudina
साहित्य- दोन वाट्या कणीक, अर्धी वाटी पुदिना, हिरवी मिरची, पाव चमचा ओवा, अर्धा चमचा जिरे, दोन चिमटी खायचा सोडा, तीळ १ चमचा, चवीनुसार मीठ

कृती- प्रथम तसराळ्यात कणीक घ्या. त्यात पुदिना स्वच्छ धुवून बारीक चिरून घाला. हिरवी मिरचीही अगदी बारीक चिरून घाला. नंतर ओवा, जिरे, खायचा सोडा, मीठ, तीळ घालून चांगले कालवून घ्या आणि थोडे थोडे पाणी घालून घट्ट भिजवा. दहा मिनिटे झाकून ठेवा व नंतर गोळ्या करून पुर्‍या लाटा व तेलात खमंग तळून काढा. गरमागरम पुर्‍या चटणी, रायते, लोणचे अथवा सॉसबरोबर खायला द्या.

पुर्‍यांचे पीठ भिजविताना सोडा घातलेला असल्यामुळे या पिठात हळद घालू नये. नाहीतर पीठाला लाल रंग येऊ शकतो. पुदिन्याचा वेगळा स्वाद येतो.

Leave a Comment