शाओमीचा एमआय ४ स्मार्टफोन झाला स्वस्त

mi4
मुंबई: शाओमी कंपनीने आपल्या एमआय ४ या स्मार्टफोनच्या किंमतीत घट केली असून भारतीय मोबाइल बाजारपेठेत धुमाकूळ घालणाऱ्या शाओमीचा हा स्मार्टफोन तब्बल २ हजारांनी हा स्वस्त झाला आहे.

१६ जीबीचा १९,९९९ रु. किंमतीचा हा स्मार्टफोन आता १७,९९९ रु. किंमतीला मिळणार आहेत. तर ६४ जीबीचा २३,९९९ रु. किंमतीचा हा स्मार्टफोन आता २१,९९९ रु. किंमतीत उपलब्ध आहे.

शाओमीने पाच वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त नुकतीच ग्राहकांसाठी खास ऑफर ठेवली होती. यामध्ये एमआय४ च्या किंमतीत घट करण्यात आली होती. यावेळी भारतातील याला फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याचे कंपनीच्या निदर्शनास आले. त्यामुळेच आता कायमस्वरुपी या किंमतीत घट करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. Mi 4 आता फ्लिपकार्ट आणि मोबाइल स्टोअरवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Leave a Comment