
नवी दिल्ली – गुगलने डुडलच्या माध्यमातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२४ व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले आहे.
गुगलची बाबासाहेबांना डुडलद्वारे आदरांजली
आंबेडकर जयंती आज देशभरात उत्साहात साजरी होत असताना, जगातील सर्वांत मोठे सर्चइंजिन असलेल्या गुगलनेही त्यांना आजचे डुडल त्यांना समर्पित केले आहे. गुगल नेहमीच डुडलच्या माध्यमातून महान व्यक्तींना अभिवादन करत आलेले आहे. गुगलने डुडलवर डॉ. आंबेडकरांचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे.
