रामदेव बाबांना कॅबिनेट मंत्रिपद

ramdev
हरियाणा सरकारने आपल्या राज्याचे ब्रँड अँबेसिडर म्हणून योगगुरू रामदेवबाबा यांची अगोदरच नेमणुक केली असून आता त्यांना कॅबिनेट दर्जा देण्याची तयारीही सुरू झाली असल्याचे समजते. मात्र सरकारच्या या निर्णयाला काँग्रेस पक्षाने विरोध दर्शविला आहे.

हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज या संदर्भात बोलताना म्हणाले की रामदेवबाबा हरियाणा सरकारचे ब्रँड अँबेसिडर आहेत आणि ते योग आणि आयुर्वेदाचा प्रसार करत आहेत. या दोन्ही बाबी नागरिकांच्या भल्यासाठी आहेत. त्यामुळेच त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देणे हे योग्य आहे. अर्थात रामदेवबाबा हे पद स्वीकारणार वा नाही हे त्यांच्या इच्छेवर अवलंबून असेल.

काँग्रेसने मात्र रामदेवबाबा हे केवळ योगगुरू नाहीत तर मोठे व्यावसायिकही आहेत असे सांगताना त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले आहे. यात रामदेवबाबांचे आर्थिक संबंध जुळलेले आहेत असा आरोपही त्यांनी केला आहे. रामदेव बाबांना कॅबिनेट मंत्रीपद देणे हा त्यांना भाजपचे जे समर्थन केले त्याचेच बक्षीस असल्याचेही काँग्रेसचे म्हणणे आहे.

Leave a Comment