सापडणार एलियनच्या अस्तित्वाचे पुरावे; नासाच्या संशोधकांचा दावा

nasa
वॉशिंग्टन :नासाने पृथ्वीवर एलियनचा वावर होता, यासंबंधीचे स्पष्ट पुरावे २०२५ पर्यंत सादर करणार असल्याचा दावा केला आहे. याशिवाय साक्षात एलियनचा शोध २०३५ ते २०४० पर्यंत लागण्याचा निश्चयी दावा नासाच्या वरिष्ठ संशोधकांनी केला आहे.

पृथ्वीशिवाय इतरत्र मानवी जीवनाचे अस्तित्व सिद्ध करण्यास दशकभराचा काळ लागण्याची शक्यता या वेळी वर्तवण्यात आली. त्याचे सुस्पष्ट पुरावे प्राप्त करण्यास २०-३० वर्षांचा काळ लागणार असल्याचे नासाचे प्रमुख संशोधक अ‍ॅलेन स्टोफॅन यांनी सांगितले. ‘पृथ्वीशिवाय विश्वात मानवी वसाहतींची शक्यता’ या विषयावरील चर्चासत्रात स्टोफॅन बोलत होते. नासाला या संशोधनाची दिशा सापडली आहे. नासाच्या संशोधनाच्या अचूकतेबद्दल त्यांनी विश्वास व्यक्त केला व तंत्रज्ञानाच्या मर्यादेमुळे अद्याप अतिमानवांचे अस्तित्व सिद्ध होऊ शकले नसल्याचे ते म्हणाले.

Leave a Comment