रोटेट होणार्‍या कॅमेर्‍यासह आला ओपोचा एन थ्री स्मार्टफोन

oppo-n3
चीनची स्मार्टफोन उत्पादन कंपनी ओप्पोने त्यांचा नवीन प्रिमियम स्मार्टफोन एन थ्री भारतात लाँच केला असून रोटेटिंग कॅमेरा हे याचे खास आकर्षण आहे. हा फोन प्री बुकींग करूनच सर्व स्टोअर्समध्ये मिळू शकणार आहे. याची किंमत आहे ४२९९० रूपये. विशेष म्हणजे हा फोन आक्टोबर २०१४ मध्ये जेव्हा प्रथम सादर केला गेला तेव्हा त्याची किंमत ६४९ डॉलर्स म्हणजे ४० हजार रूपये होती.

या फोनसाठी १६ एमपीचा मोटोरोईज्ड रोटेटिंग कॅमेरा दिला गेला आहे. एक बटण टॅप करून अथवा फिंगर प्रिंट सेंसरला टच करून हा कॅमेरा २०६ अंशात फिरविता येतो. ५.५ इंची डिस्प्ले, २ जीबी रॅम, अँड्राईड किटकॅट ४.४, अड्रीनो ३३० जीपीयू आधारित कलर ऑपरेटिंग सिस्टीम,३२ जीबी मेमरी, मायक्रो कार्डच्या सहाय्याने वाढविता येण्याची सुविधा अशी याची अन्य फिचर्स आहेत. फोरजी, थ्रीजी, वायफाय, ब्ल्यू टूथ, अशी कनेक्टीव्हीटी असून फोन अनलॉक करणे अथवा अॅप्स एनक्रिट करण्यासाठी फिंगरप्रिट स्कॅनरचा वापर युजरला करता येणार आहे.

Leave a Comment