मंगळावर आढळला पाण्याचा प्रचंड साठा

mars
लंडन : शास्त्रज्ञांना मंगळ ग्रहावर गोठलेल्या स्थितीतील पाण्याचा प्रचंड साठा असल्याचे आढळून आले असून १५० अब्ज क्युबिक मीटर इतका प्रचंड साठा असलेल्या या पाण्याने संपूर्ण ग्रह हिमाच्छादित केला जाऊ शकेल, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था असलेल्या नासाच्या शास्त्रज्ञांना हा शोध लावण्यात यश आले आहे.

या हिमसाठ्याची तुलना पृथ्वीवरील बर्फाशी करून त्या अभ्यासावर आधारित निष्कर्ष काढण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्नशील आहेत. मंगळावरील एकूण पाण्याच्या साठ्याचा हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आहे. या पाण्याची वाफ झालेली नाही याचा अर्थ धुळीच्या दाट आवरणामुळे या साठ्याचे संरक्षण होत आहे, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

मंगळावरील अतितप्त वातावरणात पाण्याची सहजी वाफ होते. मात्र या साठ्याचे त्यापासून संरक्षण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शास्त्रज्ञांचे हे संशोधन अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे. एका विज्ञानविषयक नियतकालिकामध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Leave a Comment