उत्तराखंडचा ब्रँण्ड अॅम्बेसेडर होणार विराट

virat-kohli
देहरादून: गर्लफ्रेंड अनुष्का शर्मासाठी टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली हा कोणतेही मानधन न घेता उत्तराखंडचा ब्रँण्ड अॅम्बेसेडर होणार आहे.

चारधाम यात्रेच्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी उत्तराखंड पर्यटन विभागाच्या जाहिरातीत विराट कोहली यापुढे दिसून येणार आहे. उत्तराखंड सरकारचे निमंत्रण स्वीकारत त्याने उत्तराखंड पर्यटन विभागाचा ब्रँण्ड अॅम्बेसेडर होण्यास आपली संमती दर्शविली आहे.

विराटसमोर उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरिश रावत यांनी ठेवलेला हा प्रस्ताव त्यानेही लागलीच मान्य केला. त्याच्या होकारामुळे मात्र, उत्तराखंडचे नागरिक भलतेच खूश झाले आहेत.

Leave a Comment