डायनासोरपेक्षाही प्राचीन प्राणी चीनमध्ये सापडला

dragon
बीजिंग : एका प्राचीन प्राण्याचे अस्तित्व चीनमध्ये सापडले असून हा प्राणी सॅलामेंडर म्हणून ओळखला जात असे आणि डायनासोरपेक्षा जुन्या काळात पृथ्वीवर अस्तित्वात असल्याचे संशोधकांचे मत आहे. सुमारे १७ कोटी वर्षांपासून हा प्राणी पृथ्वीवर आहे. या काळात उत्क्रांतीच्या प्रक्रियेत मानवापासून सूक्ष्म जिवाणूतही खूप मोठे बदल झाले मात्र, हा प्राणी आहे तसाच आहे.

दक्षिण चीनमध्ये एका उद्यानाची देखभाल करणा-या व्यक्तीस हा प्राणी आढळून आला. उत्पत्तीपासून आहे त्याच स्वरूपात हा प्राणी आधुनिक काळात सापडल्याने त्याला जिवंत जीवाश्म म्हणूनही संबोधले जात आहे. पृथ्वीवर प्रत्येक जिवंत किंवा निर्जीव वस्तूंमध्ये काळानुरूप बदल होत गेले. मात्र, सॅलामेंडर बदललेला नाही. प्रचंड उष्णतामानातही तग धरून राहणा-या प्राण्यास सॅलामेंडर म्हणतात.

चिनी कायद्यानुसार हा प्राणी नामशेष होत चाललेल्या प्रजातींच्या यादीत आहे. या प्राण्याची शिकार करणे हा चीनमध्ये गुन्हा ठरतो. त्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद कायद्यात आहे.

Leave a Comment