सर्वाधिक मायलेज देणारी दुचाकी ‘आयस्मार्ट’ लवकरच भारतात

ismart
नवी दिल्ली- आता ग्राहकांच्या सेवेत लवकरच भारतातील सर्वाधिक मायलेज देणारी दुचाकी हजर होणार आहे. स्प्लेंडरच्या अभूतपूर्व यशानंतर आता हिरो मोटोकॉर्प याच दुचाकीचे अद्ययावत मॉडेल बाजारात आणत आहे.

स्प्लेंडरपेक्षा आकर्षक लुकमधील ‘आयस्मार्ट’चे अॅव्हरेज १०५ किमी प्रतीलीटर असेल असा दावा कंपनीने केला आहे.

स्पोर्टी लूक, फ्युल इफिशिअन्सी आणि आरामदायक बसण्यासाठी रचना ही हिरो मोटो कॉर्प स्प्लेंडर ‘आयस्मार्ट’ या बाइकची वैशिष्ट्ये आहेत. ९७.२ सीसी इंजिनक्षमता असलेल्या बाइकची एक्स शोरुम प्राइस ४७,९५० ते ४९,१५० च्या दरम्यान आहे.

ही गाडी वजनाला अत्यंत हलकी आहे. या गाडीचे वजन केवळ ११० कि. ग्रॅ. आहे. डिस्क ब्रेकचा पर्याय कंपनीने दिलेला नाही. या गाडीमध्ये i3S तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाचा वापर गाडी हवी तेव्हा बंद किंवा सुरू करण्यासाठी होतो. सिग्नलवर गाडी पटकन बंद करुन लगेच सुरू करता येऊ शकेल अशी सुविधा कंपनीने दिली आहे, त्यामुळे इंधनाची बचत होईल.

Leave a Comment