
अॅपल आयफोनची तीन नवीन मॉडेल्स या वर्षात लाँच करण्याची शक्यता असून या वर्षांच्या उत्तरार्धाच्या सुरवातीला म्हणजे सप्टेंबर महिन्यात ही तीन नवी मॉडेल्स लाँच होण्याची शक्यता आहे. न्यूज डॉट कॉम डॉट एयू या वेबसाईटवरील रिपोर्टनुसार आयफोन ६एस आणि ६एस+, ६ सी ही तीन नवी मॉडेल्स अॅपल लाँच करण्याची शक्यता आहे.
या वर्षभरात येणार आयफोनची तीन नवीन मॉडेल्स!
या तीन मॉडेल्सपैकी एक फक्त ४ इंच स्क्रीन साईज असलेला असेल. आयफोन लाँच झाल्यापासून त्याची स्क्रीन साईज ही ४.७ इंच आहे. म्हणजे आता लाँच होणार असलेला आयफोन हा आजवरचा सर्वात लहान स्क्रीन साईजचा असेल. आयफोन ए८ चीपसेटवर चालणारा असेल तर उर्वरित दोन ए९ या चीपसेटवर चालणारे असतील.
अॅपलच्या या नव्या अपडेटविषयी जाणकार सांगतात की आयफोन ६ सी हा स्मार्टफोन चार इंचाचा तर असेल तर अन्य दोन स्मार्टफोन ६एस आणि ६एस+ हे फ्लॅगशिप स्मार्टफोन ए९ चीपसेटवर चालतील.
