सर्व संपत्ती दान करणार अॅपलचे मुख्याधिकारी टीम कुक

tim-cook
न्यूयॉर्क- आपली सर्व संपत्ती दान करण्याचा निर्णय अॅपल कंपनीचे मुख्याधिकारी टीम कुक यांनी घेतला आहे. “फॉर्च्युन‘ या नियतकालिकात कुक स्वत:ची ७८ कोटी ५० लाख डॉलर्सची संपत्ती दान करणार असल्याचे प्रसिद्ध झाले आहे. संपत्तीचा काही भाग भाच्याच्या शिक्षणासाठी राखून ठेवणार आहेत. वॉरन बफे, बिल गेट्स यांच्यानंतर कल्याणकारी कामांसाठी संपत्ती दान करण्यासाठी कुक यांनी पुढाकार घेतला आहे.

Leave a Comment