अँड्राईडचे मेसेज अन्सेंड, डिलीट करण्यासाठी नवे अॅप

rakem
अँड्राईडने एक नवे अॅप लाँच केले असून, आता तुम्ही पाठवलेला मेसेज किंवा टेक्स्टला अन्सेंड करता येणार आहे. अनेकदा काही मेसेज चुकून इतरांना जातो अशावेळी काय करावे हा प्रश्न आपल्याला पडतो. याचवेळी हे अॅप आपल्या मदतील धावून येणार आहे. कारण की हे अॅपमध्ये रिसीव्हरच्या स्मार्टफोनमधील तुम्ही पाठविलेला टेक्स मेसेजही डिलीट करण्याची सुविधा आहे.

दुसऱ्याच व्यक्तीला अनेकदा काही महत्वाचे मेसेज पाठवल्याने आपली चांगलीच तारांबळ होते. यापुढे मात्र युजर्सचा हा त्रास RakEM या अॅपमुळे दूर होणार असून हे अॅप यूजर्सला टेक्स्ट मेसेजला अन्सेंड आणि डिलीट करण्यास मदत करते. हे अॅप कोणत्याही सर्व्हरशिवाय थेट डिवाइस टू डिवाइस तंत्रज्ञानाचा वापर करते.

Leave a Comment