
मुंबई – प्रसिद्ध वैज्ञानिक आणि आयआयटीच्या संचालक मंडळाचे माजी अध्यक्ष अनिल काकोडकर यांनी आयआयटीला स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ द्यावेत असे वक्तव्य केले आहे.
आयआयटीला स्वायत्तता द्यावी – काकोडकर
संचालकपदाचा राजीनामा दिल्याचे कारण विचारले असता ते म्हणाले की माझा कार्यकाळ संपत आला होता. त्यानंतर माझी काम करण्याची इच्छा नव्हती, असे ते म्हणाले. आयआयटीच्या संचालकांच्या निवडीसाठी बैठक झाली होती. त्या बैठकीलादेखील काकोडकर हजर नव्हते. मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि काकोडकर यांच्यामध्ये वाद झाले होते. आयआयटी संचालकांच्या निवडीमध्ये राजकीय हस्तक्षेप होत असल्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा शिक्षण क्षेत्रात होती.
